लोकपत्रच्या संपादकांवर गुन्हा दाखल.व त्यांना माफी मागायला लावली.
मुबंई (प्रतिनिधी):-
अखिल भारतीय क्रांती सेना संघटनेने लोकपत्रच्या कार्यालयात दि.8 नोव्हेंबर रोजी जाऊन शिक्षकांबद्दल अवमानकारक व अशोभनीय व समाजात तेढ निर्माण होईल असे लेखन करणाऱ्या तहकीक या संपादकांचा जाहीर निषेध करत त्यांना जाहीर माफी मागायला लावली.
शिक्षकांना समाजात खूप आदर असल्याचे व शिक्षकांबद्दल अपशब्द वापरल्यावर अशा संघटना धावून येतात. संबंधितांना जाब विचारतात, धारेवर धरतात. माफी मागायला लावतात. अन्यथा तीव्र प्रकारचे आंदोलन करणार ,असे म्हणतात.अशी सामाजिक बांधिलकी जपणारी अखिल भारतीय क्रांती सेना संघटना आहे.
महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक संघटनेने अखिल भारतीय क्रांती सेनेचे आभार मानून धन्यवाद दिले आहे. अखिल भारतीय क्रांती सेना संघटनेने त्या संपादकांना माफी मागायला लावली.
