श्रीगोंदा येथे युनिटी मेडिकेअरचे उदघाटन समारंभ.

Maharashtra varta

 श्रीगोंदा येथे युनिटी मेडिकेअरचे नव्या शाखेचे उदघाटन समारंभ,


श्रीगोंदा( प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

शॉप नंबर 1 बनकर कॉम्प्लेक्स ,दौंड जामखेड रोड, श्रीगोंदा येथे सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी एक वाजता उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य युनिटी मेडिकेअरचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गदादे यांनी दिली.


युनिटी मेडिकेअर चे उद्घाटन समारंभ राहुल दादा जगताप (चेअरमन कुकडी सहकारी साखर कारखाना) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. युनिटी मेडिकेअर च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी श्रीगोंदा विधानसभा सदस्य बबनदादा पाचपुते ,श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष बाबासाहेब भोस ,महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे संचालक घनश्याम आण्णा शेलार, श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सौ. शुभांगी पोटे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ. अश्विनी ताई कानगुडे ,तांदळी दुमाला सरपंच सौ अनिता निगडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे .

तरी या कार्यक्रमाचे संयोजक युनिटी मेडिकेअर चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गदादे तसेच त्यांचे सहकारी सागर लगड यांनी केले आहे. तरी सहकुटुंब सहपरिवार या युनिटी मेडिकेअरच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याची विनंती संयोजकांनी केलेली आहे.

To Top