ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राजगड कारखान्यास ऊस द्यावा आमदार संग्राम थोपटे .

Maharashtra varta

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राजगड कारखान्यास ऊस द्यावा :- आमदार संग्राम थोपटे .


राजगड सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर व अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न. 




राजगड (प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)


राजगड कारखाना गळीत हंगाम 20 -21 साठी कारखान्याने 2.50  लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, दररोज 1800 ते 2000 मेट्रिक टन ऊस गाळप होईल, त्यानुसार सर्व ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा विभागवार पोहोच करण्यात येत आहे. पुढील काळात कारखाना संचालक मंडळाने कारखाना गाळप क्षमता 1250 मॅट्रिक टनावरून 3500 मेट्रिक टनापर्यंत आधुनिकीकरण 90 के एलपीडी  क्षमतेचा डीस्टीलरी ,18 मेगावॅट क्षमतेचा कॉ-जनरेशन प्रकल्प हे तीनही प्रकल्पाचे डीपीआर तयार करून त्याप्रमाणे शासन दरबारी प्रस्तावांची पुढील कार्यवाही चालू केली आहे .तसेच 80 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे .चालू हंगामात या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात होईल ,पुढील काळात हे सर्व प्रकल्प सुरू झाल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना वाढीव दर देण्यात मदत होईल व सर्व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंदलेला सर्व राजगड कारखान्यात देऊन सहकार्य करावे ,अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.


अनंतनगर- निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2020 -21 करिता बॉयलर अग्नी प्रदीपन  समारंभ व गळीत हंगाम शुभारंभ रविवार दि 8 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी साडेनऊ वाजता कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे (मा. मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ .स्वरूपाताई थोपटे या उभयतांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर प्रसंगी ज्योती मंदिर व वजन काटा विभागात कारखान्याचे संचालक सोमनाथ वचकल व त्यांच्या सुविद्य पत्नी विद्या वचकल यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन विकास कोंडे, ज्येष्ठ संचालक किसन सोनवणे ,कृष्णाजी शिनगारे ,पोपटराव सुके, शैलेश सोनवणे उत्तमराव थोपटे, राजेश काळे ,विठ्ठलराव कुडले, डॉ.संभाजी मांगडे, शोभाताई जाधव ,सीमाताई सोनवणे, संदीप राव नगीने, शंकराप्पा धाडवे मारुती गुजर तसेच कारखान्याचे  कार्यकारी संचालक सुनील महिंद ऊस उत्पादक सभासद शंकर नाना मालुसरे व्हाईस चेअरमन खरेदी विक्री संघ ,संचालक शिवाजी सासवडे ,संजय सोनवणे आप्पा चव्हाण ,अशोक चव्हाण माऊली पांगारकर सरपंच मोहरी, नितीन पांगारकर ,हरिभाऊ बाठे बिगर सभासद व हितचिंतक तसेच सर्व खाते प्रमुख व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

To Top