डॉ. विराज सूर्यवंशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार.

Maharashtra varta

 डॉ. विराज सूर्यवंशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार. 



भोर (प्रतिनिधी):

 राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू आणि  प्रहारचे राज्याचे युवा नेते व बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका  यांच्या वतीने  प्रहार पुणे जिल्हा सेवक संतोष मोहिते यांनी व भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने  डॉ.विराज सूर्यवंशी( नसरापुर ),यांना  कोरोना योद्धा म्हणून  सन्मानित करण्यात आले.प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कोरोना महामारी मध्ये केलेल्या उत्कृष्ट वैद्यकीय  कामगिरीबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष,भोर यांच्या वतीने कापूरहोळ ता.भोर येथील कोव्हीड केअर सेंटर च्या प्रांगणात हा पुरस्कार प्रहारचे पुणे जिल्हा सेवक  मोहिते व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळेस अमोल पांगारे, नवनाथ पांगारे , शंकर गोळे , सदाशिव पांगारे, नारायण दळवी व हॉस्पिटलचे डॉ. विराज सुर्यवंशी डॉ.सुप्रिया चव्हाण डॉ.स्वप्निल लिम्हण डॉ.शुभम हुरगुळे,डॉ.प्रगती नगिणेआणि हॉस्पिटल इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


 

 

 

To Top