भेलके महाविद्यालय होणार संविधान साक्षर- डॉ.तुषार शितोळे.
भोर (प्रतिनिधी)
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर शंकरराव भेलके महाविद्यालय येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये डॉ.जगदीश शेवते म्हणाले, अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून खंडप्राय भारत देशासाठी आवश्यक असणारी तत्वे संविधानात स्वीकारली गेली त्यामुळे सर्वाना एकत्र बांधून ठेवण्यात संविधान यशस्वी झाले आहे.प्रा.सहदेव रोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्माण करण्यात महत्वपूर्ण योगदान होते, त्याचप्रमाणे आजच्या पिढीने संविधाना मध्ये जी तत्वे आहेत ती अंगीकारून देशाला भक्कम बनविले पाहिजे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी जगातली सर्वात मोठे लिखित संविधान भारताचे आहे. त्याचप्रमाणे भारताचे संविधान हे समता,न्याय, बंधुता या त्रिसुत्रीवर आधारलेले आहे असे सांगून संविधान कोण्या राजाने किंवा देवाने दिले नसून आपल्याच माणसांनी आपल्या माणसांसाठी बनविलेले एक सर्वात मोठे संविधान आहे असे मत व्यक्त केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये वर्षभर संविधान साक्षरता कार्यक्रम राबविले जाणार आहे.यामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, प्रकट वाचन यासारखे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी दिली.यावेळी महाविद्यालयातील डॉ.हिमालया सकट,डॉ.राजेंद्र सरोदे,प्रा.पौर्णिमा कारले, प्रा.भगवान गावित,प्रा .जीवन गायकवाड,डॉ.सचिन घाडगे,प्रा.प्रल्हाद ननावरे,प्रा.अमोल पावगे,प्रा.रोशनी पवार,प्रा.अतुल मरेवाड, विकास ताकवले, सुमित कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन महेश दळवी, स्वप्नील सरपाले यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.प्रवीण गायकवाड यांनी मानले

