रायरेश्वरावर गिर्यारोहकांचा दुर्गवीर पुरस्काराने गौरव .
भोर ( प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जिवंत वारसा तरुण पिढीला समजावा यासाठी आंबेगाव बुद्रुक येथील श्री शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायरेश्वरावर आयोजित केलेल्या गडचढाई स्पर्धेतील विजेत्या गिर्यारोहका़चा दुर्गवीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गडावर सफाई अभियान राबवून हर हर महादेव, जय शिवराय च्या जयघोषात शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
(रविवार दि.२२) किल्ले रायरेश्वर चढाई स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत ३ वर्षाच्या मुलां मुलींसह ६५ वर्षांचे जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे परिसरातील अडिचशे दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला. आयोजन केल होत.
कराड चे गिर्यारोहक स्वप्नील जिरगे यांनी गडकोटांचे ऐतिहासिक महत्त्व, शिवकाळातील वैभव याची माहिती दिली.
ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्पर्धात्मक युगातील युवकां समोरील आव्हाने या विषयावर संवाद साधला. शिवरायांच्या शिकवणीची तरुण पिढीला गरज आहे. असे सांगितले.
मुलांना "दुर्गवीर" प्रशस्तीपत्रक तर युवक व जेष्ठांना दुर्गवीर पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
दरमहा एका गडावर चढाई व सफाई अभियान राबविण्यात येणार आहे असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल पवार यांनी सांगितले.
संयोजन विजयसिंह मोहिते,संतोष कांबळे,संजय रेणुसे,प्रशांत माळी, अनिल पोमन,विजय हिंगे, सचिन बाड यांनी केले.

