भोर तालुका प्रहार पक्षाच्या अध्यक्षपदी संतोष मोहिते.

Maharashtra varta

  भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी संतोष मोहिते.



भोर ( प्रतिनिधी)

भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी संतोष मोहिते यांची नव्याने निवड करण्यात आलेली आहे.

भोर तालुक्यातील पूर्व भागातील भोंगवली ता. भोर येथील संतोष मोहिते हे रहिवासी आहेत. सन 2018 पासून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे काम करत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम, सामाजिक आंदोलने ,कोरोना काळात विविध उपक्रम, गोरगरिबांना मदत यामध्ये सक्रियपणे सहभाग नोंदविला आहे.


 राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार चे युवा नेते अजय महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा  संघटक नीरजभाऊ कडू यांनी  मोहिते यांची  निवड केलेली आहे.

यावेळेस नीरज कडू  (जिल्हा संघटक) नंदकिशोर जगदाळे सरपिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा )अध्यक्ष  महेश कनकुरे हवेली तालुका अध्यक्ष  पंकज बगाडे ,हवेली तालुका अध्यक्ष कामगार गौरव शिंदे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष कामगारआणि प्रहार पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळेस नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष मोहिते म्हणाले की,भोर तालुक्यात  प्रहार पक्षाच्या माध्यमातून  अन्यायाला वाचा फोडून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष  प्रयत्नशील राहून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते व अजय महाराज बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारचे विचार व कार्य व विविध उपक्रम प्रभावीपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

To Top