No title

Maharashtra varta

 सरपंचांची संघटना होणे गरजेचे- शरद पवार .


बारामती (प्रतिनिधी)

सरपंचाचे प्रश्न व काम करीत असताना येणाऱ्या अडीअडचणी त्या सोडविण्यासाठी सरपंच संघटना आवश्यक आहे. यामधून सरपंचाची विचारांची देवाणघेवाण होऊन संघटनात्मक पातळीवरून प्रश्न समजून ते सरकारसमोर मांडता येतात ,त्यासाठी सरपंचांची संघटना होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देशाचे मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

बारामती कृषी महाविद्यालयात सरपंच परिषदेची निमंत्रित सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आली होती,या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी  शरद पवार ,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

ही बैठक सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी आयोजित केली होती. या बैठकीला  सरपंच परिषदांच्या समन्वयिका आदर्श सरपंच रेखाताई विद्याधर टापरे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

यावेळी रेखाताई टापरे यांनी महिला सरपंचांचे प्रश्न शरद पवार यांच्याकडे  मांडले व यावेळी शरद पवार यांनी  सरपंचांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.


यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निमंत्रित २० सरपंच व झूम मिटींगद्वारे अनेक सरपंच उपस्थित होते.


यावेळी सरपंच परिषदेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.



To Top