कोरोनाग्रस्त शिक्षकांना जिल्हा परिषद मदत निधी मिळावा:-पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.
पुणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या एक दिवसाच्या मदत निधीतून कोरोनाग्रस्त शिक्षकांना तातडीने मदत देण्याची मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी covid-19 या आजाराच्या आपत्ती निवारणाचे काम मागील सहा महिन्यांपासून प्रामाणिकपणे व उत्कृष्ट केले आहे.जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आपत्ती निवारण मदत निधीसाठी पुणे जिल्हा परिषदेस एक दिवसांचे वेतन दिलेले आहे. जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील पाच शिक्षक मरण पावले आहेत., तरी कोरोना बाधीत शिक्षकांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे केली असल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे.
खासगी दवाखान्यांमधील उपचाराचा खर्च मिळावा.सरकारी दवाखान्यांबाहेरील औषधांचा खर्च मिळावा.मयत शिक्षकांना विमा व सानुग्रह अनुदान मदत निधी मिळावा.या मागण्या पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजितदादा शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब तसेच शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे करण्यात आली आहे.