शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना.

Maharashtra varta

 शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी थेट "व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे" संवाद साधताना.



पुणे( प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे  यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.गुंजवणीचे पाण्याचा प्रलंबित  प्रश्न व सिंहगडचे ठप्प झालेले पर्यटन या मुद्याला स्पर्श करत पुणे जिल्ह्यातील विविध समस्या,विकासकामे मांडत  सविस्तर संवाद साधला.


 महाराष्ट्र  राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवसाहेब ठाकरे  यांनी काल दि.27ऑक्टोबर 2020 रोजी सायं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे काही जिल्हाप्रमुखांशी थेट संवाद साधताना त्यांचे कार्यक्षेत्रातील स्थानिक पातळीवरील प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.या वेळी पुणे जिल्हाप्रमुख रमेशबापु कोंडे यांचेकडुनच त्यांचे भागातील प्रश्न व समस्या समजुन घेत असताना रमेशबापु कोंडे यांनी गेल्या आठ महिन्यापासून किल्ले सिंहगडचे पर्यटन ठप्प झाल्याने येथील तब्बल साडेचारशे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन खडकवासला ते पानशेत व शिवगंगा परिसरातील एकुणच अर्थचक्र ठप्प झाले असल्याने येथील हजारो कुटुंबाना याचा फटका बसतोय., तरी राज्य शासनाने आता सिंहगड किल्ला   पर्यटकांंसाठी तातडीने सुरु करण्याचा आग्रह धरला. याच बरोबर जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांनी गुंजवणीचे हक्काचे पाणी भोर,वेल्हे व हवेलीतील शिवगंगा खोऱ्यातील गावांना मिळावे ,म्हणुन सुरु असलेल्या संघर्षाचा मुद्दाही उपस्थित केला. मागील तीन-चार वर्षांपासुन तीनही तालुक्यातील जनतेने  सरकार दरबारी यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याचे सांगितले.तिनही तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सातत्याने या विषयी आवाज उठवत असुन सर्वपक्षीय कृती समितीचे माध्यमातुन या प्रश्नी सुरू असलेल्या लढ्याची दखल घेऊन मुख्यमंत्री म्हणुन आपण स्वताः या प्रश्नी हस्तक्षेप करून भोर,वेल्हे व हवेलीतील जनतेला न्याय द्यावा ,अशी सादच रमेशबापू यांनी उद्धवसाहेबांना घातली. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचेशी चर्चा करताना मराठा आरक्षण मुद्याला स्पर्श करून त्यांनी स्थानिक पातळीवर मराठा समाजातील विद्यार्थी, तरुण व नोकरदार यांचे समोर निर्माण झालेले प्रश्न व व्यथाही मांडल्या. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांनी स्वतः अतिवृष्टीचे तुमच्या डोंगरी तालुक्यात काय परिणाम जाणवले हे विचारले असता जिल्हाप्रमुख रमेशबाप्पू कोंडे यांनी भोर,मुळशी,वेल्हे पुरंदर व पश्चिम हवेलीतील शेती व पिकांचे अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाची विदारक स्थिती त्यांचे समोर मांडली.यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाहीच पण पक्षाचे प्रतिनिधि म्हणुन तुम्ही स्वतः शेतकरी व प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहुन यात महत्वाचा दुवा म्हणुन काम करावे अशी सुचना केली. 

सध्याचे कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारकडुन झालेली मदत,येणारा निधी व उपाय योजनांची आजची सद्यस्थिति रमेशबापू कोंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे समोर मांडली. रात्री उशीरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हि बैठक आयोजित केली गेली होती. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी थेट पक्षाचे जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला असल्याने पदाधिकारी यांना मुख्यमंत्री यांचे समोर आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. जिल्हाप्रमुख रमेशबापू कोडे यांनी मुळशीतील हिंजवडी- माण- मारुंजुजी, पिरंगुट-घोटावडे तसेच वेळु - खेडशिवापुर  सातारा रस्ता व भोर,शिरवळ  भागातील एमआयडीसी व येथील उद्योजक,कामगारांना वारंवार भेडसावणारे प्रश्न मुख्यमंत्री यांचे कानी घातले. 

 मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी रमेशबापू कोंडे यांचेशी बोलत असताना कोरोनाच्या काळात ठप्प झालेले "किल्ले सिंहगड व इतर ठिकाणचे पर्यटन शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान व त्यांचे इतर प्रश्न, स्थानिक एमआयडीसीचे प्रश्न व गुंजवणीचे पाणी प्रश्नाचे मुद्यावर निश्चितच विचार केला जाईल असे बोलुन शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे  यांना आश्वस्त केले.



To Top