जमिनीतील गुंतवणूक अधिकच सुरक्षित व फायदेशीर:-उद्योगपती विनोद जाधव.
जैन फार्म डेव्हलपर्सचे" पिकॉक हिल फेज 2 या 30 एकरातील प्लॉटिंग चे उद्घाटन.
भोर (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
पैसा गुंतवण्याचे अनेक मार्ग आहेत. विश्वासावर पैसे ठेवण्याचे दिवस आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. पैसा गुंतवण्याचे विविध मार्ग आहेत. त्यातील सोपा, अधिक विश्वसनीय व जास्त परतावा, कमीत कमी कालावधीत देणारा तो म्हणजे जमीन खरेदी करणे होय .आपल्याजवळील बचतीची रक्कम जमिनीत लावणे. काही कालावधीत या जमिनीची किंमत वाढते .ते आपल्या स्वतःचे हक्काचे प्रॉपर्टी कार्ड होते. आणि त्यातून विक्री केल्यास अथवा जमीन डेव्हलप करून भौतिक सुविधा निर्माण केल्यास आपली मूळ झालेली गुंतवणूक अधिक फायदेशीर व जास्त उत्पन्न देणारी ठरते. त्यासाठी आपले पैसे जास्तीत जास्त जमिनीत गुंतवा, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे उद्योगपती व युवा शिक्षण महर्षी विनोद जाधव यांनी व्यक्त केले.
पी. एम. आर. डी. ए. हद्दीत समावेशीत असलेले व या गावातून रिंग रोड जात असलेले आणि राष्ट्रीय महामार्ग पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले व पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असलेले आणि निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कांबरे खे.बा. गावात डांबरी टच असलेले "जैन फार्म डेव्हलपर्सचे" पिकॉक हिल फेज 2 या 30 एकरातील प्लॉटिंग चे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.
या प्रसंगी जैन उद्योग समूहाचे चेअरमन मा. राजीव जैन, संचालिका ताईसाहेब जैन, के.जी. ग्रुपचे व त्रिनीटी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे उद्योगपती विनोद जाधव,निर्मिक प्रोपर्टी सोल्युशन चे मॅनेजिंग डायरेक्टर अक्षय बोराटे, पुण्याचे प्रमोटर्स अँड बिल्डर्स उद्योजक संतोष पासलकर, संस्कृती डेव्हलपर्सचे जितेंद्र भोसले, महाराष्ट्राचे प्रसिद्ध आर्किटेक्ट अभिषेक साळुंखे, महिला कल्याण ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष मीनाताई गायके, विजय माने, प्रसाद भास्करे (माढा) तसेच पुण्यातील उद्योजक मंडळी या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळेस पिकॉक फील फेज 2 कांबरे खे. बा. मधील तीस एकर प्लॉटिंग प्रोजेक्टमधील तीन प्लॉट उत्कृष्टरित्या सेल केल्याबद्दल देसाई ,ननावरे, वैभवजी खाडे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी जैन फार्म अँड लँड डेव्हलपर्स चेअरमन राजीवजी जैन यांनी मनोगतात असे म्हटले की, " इंग्रजीत पैशाला "अर्थ" म्हटले आहे .या अर्थाला "अर्थ" निर्माण करण्यासाठी म्हणजेच "अर्थ जमिनीमध्ये पैसे लावणे. तेव्हा "अर्थ इझ अर्थ" हे सत्यात उतरेल. जमिनीत गुंतवणूक केल्यास ती अधिकच फायदेशीर ठरते. असे मत जैन उद्योग समूहाचे राजीवजी जैन यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन 'प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार' यांनी केले.
(शुद्ध व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कांबरे खे. बा. येथील पिकॉक हिल फेज 2 च्या 30 एकरातील प्रोजेक्ट प्लॉटिंगची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे असणार आहे. यात अंतर्गत रस्ते, 20 फुटाचे असणार आहे. संपूर्ण प्लॉटला डिमार्केशन पोल, पूर्ण लेआउट, तार पोल कंपाउंड, डांबरी खडीकरण ,रस्ते, स्ट्रीट लाईट पाणी कनेक्शन, गार्डन उपलब्ध केले जाणार आहे.)