वेल्हे तालुक्यात गाव तेथे सीसीटीव्ही कॅमेरे उपक्रमास सुरुवात:- पोलीस निरीक्षक विनायक देवकर.
वेल्हे (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हे आढावा बैठकीच्या वेळी पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधीकारी यांना CCTV चे महत्व व त्यांचे पोलीस विभागास होणारे सहकार्य याबाबत माहीती देवून, पोलीस स्टेशन हद्दीमधील महत्त्वाचे ठिकाणे, चौक व रस्ते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरता त्यांचे महत्त्व सर्व नागरिकांना समजावून सांगून, लोकसहभागामधून जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याबाबत सुचित केले होते,त्यानुसार वेल्हे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन हाद्दीमधील महत्त्वाचे ठिकाणे, चौक व रस्ते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीमधील महत्त्वाचे ठिकाणे, चौक व रस्ते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ करण्यात आला.
त्या अनुषंगाने वेल्हे पोलिस स्टेशन हद्दीमधील विंझर या गावातील मुख्य चौक व रस्त्यावर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विलास किरवे यांचे माध्यमातुन CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
तसेच वेल्हे या तालुक्याच्या ठिकाणी मुख्य बाजारपेठ, मावळ चौक या ठिकाणी बाजारपेठेमधील व्यापारी यांचे माध्यमातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
(वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर म्हणाले की,सीसीटीव्ही कॅमे-यामुळे निश्चितच जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. त्याचबरोबर गुन्हेगारी क्षेत्रावरती वचक बसविण्यामध्ये "थर्ड आय" म्हणून याचा निश्चितच उपयोग होईल. तसेच एखादा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अथवा अनुचित घटना घडल्यास त्याची उखल होण्यास पोलीस विभागाला त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे. तरी नागरिकांनी त्याचबरोबर सर्व व्यवसायिक यांना आव्हान करण्यात येत आहे की, आपण जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून आपल्या त्याचबरोबर नागरिकांची आणि वेल्हे तालुका मधील सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांचा उपयोग होईल.)