शिवकालीन शस्त्र,शिक्के पुजनाने छत्रपती शिवरायांना मानवंदना :सिंहगड खोऱ्यात शिवकाळ जागा .

Maharashtra varta

 



शिवकालीन शस्त्र,शिक्के पुजनाने छत्रपती शिवरायांना  मानवंदना :सिंहगड खोऱ्यात शिवकाळ जागा. 

भोर  ( वार्ताहर ) 

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

विजयादशमी निमित्त सिंहगड  पायथ्याच्या निगडे मोसे येथील छत्रपती शिवाजी महाराज  स्मारक वीर योद्धे समुह शिल्प संग्रालयात मावळा जवान संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवकालीन दसरा महोत्सवात वीर मावळ्यांच्या दुर्मिळ दस्त , शस्त्र, शिक्के ,नाणी पुजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.हर हर महादेव ,जय शिवराच्या जयघोषाने शिवकाळ जागा झाला.झेंडुंच्या फुले व आपट्याची पानांची स्मारकात आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते , नांदेड सिटीचे संचालक अँड. नरसिंह लगड व शुरयोध्दे येसाजी कामठे परिवाराचे भाऊसाहेब कामठे यांच्या हस्ते शस्त्र, शिक्के ,दस्त पुजन करण्यात आले.

इतिहास अभ्यासक व शिल्प संग्रहालयाचे संचालक दत्ताजी नलावडे यांनी शिवकालीन दसरा महोत्सवाची माहिती दिली. पुणे विभाग माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण माताळे , भुषण  निवंगुणे ,जेष्ठ पत्रकार प्रकाश गोरे ,ह. भ. प. विजय तनपुरे , पत्रकार राहुल हरिभक्त ,सरपंच संतोष तांगुदे , जयंत निवंगुणे, निखिल तनपुरे ,सुरेश ढेबे  आदी उपस्थित होते. संयोजन मावळा संघटनेचे कार्यवाह रोहित नलावडे यांनी केले

 छत्रपती शिवरायांचे दुर्मिळ चित्र , स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे दुर्मिळ शिक्के , ऐतिहासिक दस्त ,तसेच स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देणारया वीर मावळ्यांच्या घराण्यातील दुर्मिळ शस्त्र ,दस्त हे महोत्सवाचे  आकर्षक ठरले. 

सामाजिक कार्याबद्दल खडकवाडीचे सरपंच संतोष तागु़ंदे व आंबी येथील युवा कार्यकर्ते भुषण संजय निवंगुणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

    सुरेश मोहिते म्हणाले, छत्रपती शिवरायांनी मोगली परकियांची शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून मानवतावादी  हिंदवी स्वराज्य हे  स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. त्यांनी   दसरा व इतर सणाला मानाचे स्थान दिले. आपल्या वीर मावळ्यांच्या सोबतीने दसरा सण साजरा करून शिवराय मावळ्यांना जुलमी शत्रू विरुद्ध लढण्यास बळ देत. सीमोलंघन झाल्यानंतर मावळ्यांसह छत्रपती शिवराय मोहीमेवर रवाना होत .या  शिवकालीन दसरा सणाला  उजाळा देऊन नवीन पिढीत राष्ट्रीय बाण्याचा जागर  या शिवकालीन दसरा महोत्सवाने होत आहे  . कर्तुत्ववानांच्या सन्मानाने तरूणांना प्रेरणा मिळणार आहे. 


To Top