वेल्हे (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भिम आर्मी संघटनेचा वेल्हे तालुक्यात झंझावाताला सुरवात भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश महासचिव सिताराम गंगावणे व पुणे जिल्हाध्यक्ष अमर पंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भिम आर्मी भोर वेल्हा मुळशी अध्यक्ष महेंद्र साळुंके यांच्या नेतृत्वाखाली वेल्हे तालुक्यात भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी कार्यक्षम भिमसैनिकांची वेल्हे तालुक्यातील सर्व जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने निवड करण्यात आली.
भोर विधानसभा अध्यक्ष महेंद्र साळुंके यांच्या हस्ते संघटनेच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले. वेल्हे तालुकाध्यक्षपदी विंझर गावचे भिमसैनिक विनोद भाऊ गायकवाड व उपाध्यक्षपदी वेल्हे गावचे भिमसैनिक गणेशभाऊ गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व येणाऱ्या काळामध्ये वेल्हे तालुक्यात प्रत्येक गावागावात भीम आर्मी चा झंजावात निर्माण करण्याचा मानस व सर्व तरुण भिमसैनिकांच्या पाठिशी खंबीर मागे उभे राहण्याचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवाहन केले. तरुण भिमसैनिकांची भीम आर्मी संघटनेमध्ये कार्यकारणी मध्ये समावेश होणार आहे. तसेच आगामी काळात तालुक्यातील सर्व तरुण कार्यकर्त्यांचे संघटन उभे करुन भिम आर्मी संघटना हि वेल्हे तालुक्यात झंझावात निर्माण करेल असे तरुण कार्यकर्त्यांनी मनोगतात सांगितले.
याप्रसंगी वेल्हे तालुका आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गणपत आण्णा गायकवाड,नथू गायकवाड,प्रकाश गायकवाड,कुंदन गंगावणे, साहेबराव रणखांबे , दिपक गायकवाड,प्रकाश पवार,महेंद्र रणखांबे,प्रशांत भालेराव इ.पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.