भोर ( प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
परतीच्या पावसामुळे भोर तालुक्यामधील भात व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील गावांत बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश "भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधरदादा किंद्रे" यांनी दिले असल्याची माहिती दिली.
पुणे जिल्ह्यासह भोर तालुक्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, मागील दोन - तीन वर्षांपासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. या हंगामामध्ये पिके चांगली आली होती, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले .
भोर तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागात सभापती श्रीधर किंद्रे यांनी पहाणी दौरा केला.शेतकऱ्यांना आधार देत मदतीचे आश्वासन दिले.प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक पहाणी करत माहिती घेतली.प्रशासनास पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या.
शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.यावेळेस त्या भागातील तलाठी,सर्कल, ग्रामसेवक,कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.