भोर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा :-भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.

Maharashtra varta

 


भोर  (प्रतिनिधी):-

 भोर तालुक्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो, सोयाबीन, भात पिकांचे मोठ्या प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे भोर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा .भोर तालुक्यांमध्ये 13 ऑक्टोबर पासून ते आजपर्यंत सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे फळबागांचे  नुकसानीचे पंचनामे करण्यास संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश देऊन भोर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अश्या मागणीचे निवेदन  तहसीलदार भोर यांच्याकडे भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार पुणे जिल्हा सेवक संतोष मोहिते आणि इतर कार्यकर्त्यांनी दिले आहे.


प्रहारच्या  कार्यकर्त्यांनी भोरचे तहसीलदार व भोरचे कृषी अधिकारी यांना हे निवेदन दिले आहे.  

यावेळी प्रहारचे पुणे जिल्हा सेवक संतोष मोहिते, लाला सुर्वे, जगन्नाथ तनपुरे, राजू तनपुरे आदी उपस्थित होते.

(भोर तालुका प्रहारचे कार्यकर्ते संतोष मोहिते म्हणाले की, सततच्या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शासनाने आर्थिक मदत करावी.)



To Top