दगडी चाळ, भायखळा येथे रक्तदान शिबीर संपन्न.

Maharashtra varta

 



पुणे ( प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या पंक्तीला सार्थ ठरवत कोरोना विषाणू (कोव्हिड19) काळात रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर भासत आहे .ही वास्तवता ओळखून "अखिल भारतीय सेना" यांच्या विशेष अथक प्रयत्नांतून व नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या मार्फत दगडी चाळ, भायखळा येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती अखिल भारतीय सेना" पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ. आशाताई गवळी यांनी "न्यूज वार्ताला" दिली.

दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख मा. आमदार सन्मानीय अरुण भाई गवळी (डॅडी) ह्यांच्या आशीर्वादाने  तसेच पक्ष राष्ट्रीय सरचिटणीस सौ. आशाताई गवळी(मम्मी) व कार्यसम्राट नगरसेविका सौ. गीताताई गवळी(दीदी) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भायखळा ह्यांच्या सौजन्याने व नायर रुग्णालय रक्तपेढी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण २५६ नागरिकांनी सहभाग नोंदवला.  प्रत्येक नागरिकाने आपलं सामाजिक कर्तव्य बजावून रक्तदान केले. कोरोनाच्या काळात वेळात वेळ काढून सर्व सरकारी नियमांचे पालन करून व सुरक्षित अंतर राखून रक्तदान केले.

कार्यसम्राट नगरसेविका सौ. गीताताई गवळी(दीदी) याबाबत बोलताना म्हणाल्या की, आजच्या या विज्ञान युगात गात्र दान, नेत्रदान, रक्तदान, मूत्रपिंड दान, इत्यादी दान प्रकारातून मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे, ही चाहूल व्यक्त होताना दिसत आहे. 'रक्तदान' यामधून  समतेची भावना देखील मानवधर्माची द्योतक म्हणावे लागेल. या विज्ञानयुगात माणसाने "हे विश्वची माझे घर" ही भावना हृदयात सतत जोपासली पाहिजे. मग सर्वत्र मानवधर्माची दिव्य पताका डौलाने फडकताना दिसेल.



To Top