नसरापूर ( प्रतिनिधी):-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
हातवे बु(सणसवाडी) ता. भोर येथील ह. भ. प.ज्येष्ठ सामाजिक व आध्यात्मिक कार्यकर्ते हरिभाऊ (आप्पा)बाबुराव शेलार (वय 82) यांचे दि.18 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
हातवे, बु (सणसवाडी) गावामध्ये 4 दशकाहून अधिक काळ सामाजिक ,आध्यत्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रामाणिक व उत्कृष्ट काम त्यांनी केले.
हातवे बु (सणसवाडी) गावच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या निधनाने हातवे बु (सणसवाडी )गावावर तसेच पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मागे 3 विवाहित मुले, 1 विवाहित मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भोर पंचायत समितीचे मा. उपसभापती तथा विद्यमान सदस्य लहू नाना शेलार आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे नेते मा. अध्यक्ष पै.मदनभाऊ शेलार यांचे ते वडील होत.