"काळी आई सांभाळ करी.." कोरोना विसरून शेतकरी राजा थेट शेतशिवारात!
(करंदी खे. बा. येथे "अभयजी खानापुुरेे" आपल्या शेेेतात मका पेरताना)
भुईमूग, भात तरवे, मका पेरणीसाठी महिला, मुले यांची मदत घेत पेरणीला वेग आला आहे. जिथे जास्त मजूर असेल तिथे मास्क लावत सावधगिरी बाळगली जात आहे. बियाणे व खते खरेदीसाठी नसरापूर येथे शेतकऱ्यांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. भोर ,वेल्हे तालुक्यांत कोरोनाचा थोडा फार प्रादुर्भाव होता. मात्र आता तो प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामाकडे पेरण्याकडे लक्ष केंद्रित करून पेरणीला चांगलाच वेग आला आहे. करंदी खे. बा.परिसरात ग्रामीण भागातही शेतीकामे व पेरणी कामे सुरू आहेत.

कापूरहोळ (प्रतिनिधी):-
कोरोनाला घाबरून घरात बऱ्याच दिवस थांबलेल्या शेतकऱ्यांनी शेतीकामात स्वतःला झोकून दिले आहे.. कडधान्ये,तृणधान्ये पेरणीसाठी महिला, मुले यांची मदत घेत भोर तालुक्यात पेरणीला वेग आला आहे. जिथे जास्त मजूर असेल तिथे मास्क लावत सावधगिरी बाळगली जात आहे. बियाणे व खते खरेदीसाठी सोशल डिस्टनचे पालन करत शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे.
नसरापूर भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी कोरोनाला विसरून कामाला लागला आहे. खरीप हंगामातील मशागतीसह पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत कोरोनाला घाबरून घरात थांबलेल्या शेतकऱ्यांनी शेतीकामात झोकून दिले आहे.
रोहिणी नक्षत्रातील निसर्ग चक्रीवादळादरम्यान आलेल्या पावसामुळे जमिनीची बऱ्यापैकी ओल झाली आहे. मृग नक्षत्रात पुन्हा दमदार पावसाची अपेक्षा असल्याने काही भागात पेरणी सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जात आहे. टोमॅटो, कोबी, मिरची, तूर व इतर भाजीपाल्यांची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. अजून पुरेशी ओल नाही तिथे वखरणे, ढेकळे फोडणे, बांधबंदिस्ती करणे, शेणखत टाकणे ही कामे सुरू आहेत.
कोरोनाला विसरून शेतकरी शेतशिवारात