नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे व नागरिकांच्या घराचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या ---विजयाताई भोसले.
पुणे (विशेष प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,सातारा, सांगली ,कोल्हापूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे व नागरिकांच्या घराचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याबाबत असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र किसान सभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयाताई भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषी मंत्री यांना याबाबतचे निवेदन द्वारे मागणी केली आहे.
विजयाताई भोसले यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बुधवार दि. 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा ,सांगली ,सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यात वादळामुळे व पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे व नागरिकांच्या घराचे प्रचंड अतोनात नुकसान झाले आहे .तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा, ऊस, केळी, द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले असून गावातील नागरिकांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत व घरांच्या भिंती कोसळल्या आहेत .तसेच नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
अगोदरच कोरोनाच्या भीतीखाली असलेले शेतकरी व नागरिक प्रचंड आलेल्या निसर्ग वादळामुळे व पावसामुळे नुकसान झाल्याने प्रचंड भीती व दडपणाखाली आहेत. तरी अशा या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे .शेतकऱ्यांच्या पिकांचे गावातील नागरिकांच्या घरांचे ,गोठयांचे व जनावरांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी ही विनंती या निवेदनाद्वारे केली आहे.