राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनी वेळू येथे आर्सेनिक गोळ्यांचे व अन्नधान्याचे वाटप.

Maharashtra varta
राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनी  वेळू येथे आर्सेनिक गोळ्यांचे व अन्नधान्याचे वाटप.


कापूरहोळ (प्रतिनिधी)

भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा  नेते  जीवन धनावडे व मित्र परिवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 व्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी वेळू ता. भोर या गावात  3000 नागरिकांना  कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायाकरीता "आर्सेनिक अल्बम 30' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्या औषध,  वाटपाला घरोघरी जाऊन सोशल डिस्टनसनचे पालन करत सुरुवात  करण्यात आली. 

वेळू गावचे ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते   यांच्या उपस्थितीत वाटपास सुरुवात झाली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जीवन धनावडे  म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील   नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे अभियान सुरू केले आहे.पुढे बोलताना ते  म्हणाले की, कोरोना विषाणूच्या विरोधात लढत असताना नागरिक मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा अन्य आजाराशी झगडत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापनदिनाचे औचित्य साधून अभियान सुरू केले आहे.  


गोरगरीब, निराधार वंचित नागरिकांना अन्नधान्याच्या किटाचे वाटप या प्रसंगी करण्यात आले.

भोर तालुक्याचे उद्योजक मंगेशभाऊ सूर्वे ,वेळू ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब धनवडे ,उद्योजक उमेशराव तनपुरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब वाडकर, उपस्थित होते.

To Top