सारोळे येथे शिवराज्यभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Maharashtra varta
सारोळे येथे शिवराज्यभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

कापूरहोळ (प्रतिनिधी):--
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या पंक्तीला सार्थ ठरवत कोरोना विषाणू (कोव्हिड19) च्या लढाईत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून "शिवछत्रछाया प्रतिष्ठान सारोळे" यांच्या विशेष अथक प्रयत्नांतून व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उत्तम  सहकार्यातून  रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये भारती हॉस्पिटल रक्तपेढी पथक  पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. 
        यावेळी रक्तदानाची सुरवात  गणपत भंडलकर यांनी स्वतः  रक्तदान करून उदघाटन केले. तसेच  तनुजा व सोनल सूर्यवंशी या सख्ख्या बहिणींनी व सामाजिक कार्यकर्त्या  निर्मला शेरे यांनी रक्तदान करून महिलांच्या योगदानाचे दर्शन घडवले तसेच कुलदीप साळुंखे व कुणाल पवार ,ओंकार धाडवे ,आकाश भरगुडे व मयूर गायकवाड या शिवछत्रछाया प्रतिष्ठानच्या युवकांनी या शिबिरासाठी सोशल मोडियाच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती करून  भविष्यात रक्तदानाचा तुटवडा पडू नये या कामी मोलाची भूमिका बजावली. 

या रक्तदान शिबिरास गावातील युवक वर्गाने शिबिरास चांगला प्रतिसाद दिला प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली च्या वतीने डॉ. सूर्यकांत  कराळे (तालुका आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपकेंद्र सारोळा येथे कोरोना बाबत जनजागृती करून सोशल डिस्टन्स चे पालन बाबत आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली.
एकुण 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले .त्यांना प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आले . युवक वर्गाला मार्गदर्शन केले .यावेळी शिवछत्र छाया प्रतिष्ठान च्या वतीने चहा बिस्कीट  व फळे यांची व्यवस्था रक्तदाते यांचा साठी केली होती. यावेळी डॉ. मोनाली लोणकर व डॉ अस्लम मुलाणी (वैद्यकीय अधिकारी),सुशांत मोहिते (क.सहायक) ,आबा बोरगे (आरोग्य सहायक),सुनीता मोरे (आरोग्य सेविका) श्रीम  कल्पना धाडवे श्रीम प्रतिभा साळुंखे श्रीम अनिता निकम व सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व  ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top