सोशल डिस्टन्स ठेवत करंदीत आरोग्य तपासणी.

Maharashtra varta
(करंदी खे.बा. येथे सध्या रहात असलेले परराज्यातील  व पर जिल्ह्यातील 43  नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी  "नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या" वतीने मेडिकल चेक अप करताना)
__________________________________________
कापूरहोळ( प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

 करंदी खे.बा. येथे सध्या रहात असलेले परराज्यातील  व पर जिल्ह्यातील 43  नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी  "नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या" वतीने मेडिकल चेक अप करून वैद्यकीय  प्रमाणपत्र  देण्यात आले.


करंदीच्या सरपंच अलका तळेकर व पत्रकार विठ्ठल पवार यांच्या विशेष सहकार्यातून स्वगृही जाणाऱ्या नागरिकांची सविस्तर यादी तयार करण्यात आली. 

प्रत्येक नागरिकांना संपर्क साधून नियोजित वेळेत  आरोग्य तपासणीसाठी बोलवण्यात आले. त्यामुळे कोणत्याच प्रकारची गर्दी,गोंधळ,त्रास झाला नाही.नागरिकांनी आपले आधारकार्ड सोबत आणून नागरिकांना 5 फूट अंतरावर उभे करून नसरापूर चे वैद्यकीय अधिकारी  डॉ.जयदीपजी कापसीकर व डॉ.शीतल टिके यांनी प्रत्येकाची कोविड मुद्दे पूर्ण पणे विचारात घेत प्रत्येक नागरिकांची सुयोग्य तपासणी करण्यात आली. थर्मल स्कॅनर च्या साह्याने तपासणी केली.
आपल्या गावी आता जाता येणार, ही आशा प्रत्येकाच्या मनात पल्लवित झाल्या होत्या. प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. लहान मुले आपल्या आई वडिलांना म्हणत होती,आपल्याला आता घरी जायचं ना?आता येईल ना जाता...हे नागरिक फोनवरून कुटुंबातील लोकांना सांगत होते की ,आम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र गावातच मिळाले. कोणतीही अडचण आली नाही.

नसरापूर चे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी  डॉ.शीतल टिके म्हणाल्या की,
"कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदी यामुळे गेल्या  महिन्यापासून नागरिक अडकून पडले होते. करंदीतील 43 जणांची अचूक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडे प्रमाणपत्र देण्यात आले आहे".

आशा वर्कर नीलिमा शिंदे,शशिकांत खाटपे,भानुदास थिटे,रवींद्र मांढरे,चंद्रकांत म्हस्के,विठ्ठल मस्के  ह्यांनी या कामी  मदत केली.
To Top