ग्राम पंचायत करंदी खे. बा.चे कोरोनाबाबत प्रभावी काम.

Maharashtra varta
(ग्राम पंचायत करंदी खे. बा.ता. भोर येथील ग्रामस्थांना हात धुण्यासाठी हँड वॉश ,सॅनिटायझर ,डेटॉल साबण ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले. )
==================================

कापूरहोळ( प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात यावा, म्हणून सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ देणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आताच्या घडीला आपण ही शिस्त पाळताना आपला नव्हे तर समाजाचा, देशाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाला  साथ देऊन  कोरोनावर मात करू असे आवाहन "करंदी -कांबरे खे .बा .चे" ग्रामसेवक 'परमेश्वर गोमसाळे' यांनी केले.

 ग्राम पंचायत करंदी खे. बा. ता. भोर येथील ग्रामस्थांना हात धुण्यासाठी हँड वॉश ,सॅनिटायझर,डेटॉल साबण,ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले.
 ग्रा. प .सरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांच्या हस्ते  देण्यात आले.त्यावेळी  ग्रामसेवक गोमसाळे प्रत्येक नागरिकांना महिलांना कोरोना बाबत   जनजागृती करत असताना बोलत होते.

यावेळी करंदी खे. बा. गावात कोरोना रोगा विषयी  जनजागृती दररोज करण्यात येत आहे.सहा वेळा संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. गाव परिसर शाळा, मंदिर गावचे मध्यवर्ती भागात ही फवारणी केली जात आहे.बाहेरून गावात येणाऱ्यांची नोंद ठेवली जात आहे.यावेळी सरपंच अलका तळेकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य शिपाई आशा वर्कर , उपस्थित होते.
To Top