(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे आज 5 मे 2020 रोजी निधन झाले.
सम्राट मोझे यांचे बालपण चिंचवड गावात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते .पुढे ते पुण्यात स्थायिक झाले. वडील रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला होता.मागच्या आठवड्यात त्यांनी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला होता.

संपूर्ण पुणे शहरामध्ये गोल्डमॅन अशी ख्याती असलेल्या सम्राट मोझे यांचा आज सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मोझे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.