कापूरहोळ :-(-प्रतिनिधी):-----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
सन 2019-- 20 मध्ये 'मंथन परीक्षेत' "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेडेबारे" ता. भोरचा चा विद्यार्थी वेदांत विठ्ठल पवार याने 150 पैकी 132 गुण मिळवून राज्यात दहावा व पुणे जिल्ह्यात 9 वा आणि भोर तालुक्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे .
इयत्ता पहिलीची मंथन परीक्षा जानेवारी 2020 मध्ये आयोजित केलेली होती. त्या परीक्षेत वेदांत विठ्ठल पवार याने देदीप्यमान यश मिळविले आहे.समाजातील सर्व स्तरांतून त्याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षक सौ. सुजाता तळेकर,श्याम हेडगिरे,पंकज राठोड,मुख्याध्यापक तानाजी नाईलकर यांनी मार्गदर्शन केले.
पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी के. डी.भुजबळ यांनी वेदांत पवार यांचे भ्रमण दूरध्वनी वरून कौतुक करून शिक्षकांच्या कामाबद्दल प्रशंसा व्यक्त केली आहे .
त्याने मिळवलेल्या यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित दादा शिवतरे,जिल्हा परिषद सदस्य शलाकाताई कोंडे,विठ्ठल आवाळे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे ,लहूनाना शेलार,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी अभिनंदन केले आहेत.
भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधरदादा किंद्रे बोलताना म्हणाले की,भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या गुणवत्ता पूर्ण असून शिक्षकांचे काम गौरवास्पद आहे.