(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील तेलवडी येथे दोन विद्यार्थ्यांनीचा गुंजवणी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना रविवारी (दि.3) रोजी दुपारी घडली.
श्रावणी रामदास धावले (13) व तेजा रामदास धावले (११) अशी मृत विद्यार्थ्यांनीची नावे आहेत.त्या सख्ख्या बहिणी आहेत.
कासुर्डी गु. मा. येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे श्रावणी धावले व तेजा धावले ह्या आहेत.
आज दुपारी 12 वाजता आई वडील यांच्या समवेत गाई व कपडे धुण्यासाठी गेले होते. अचानक तेजा धावले हीचा पाय नदी पात्रा शेजारी घसरला. तिला वाचवण्यासाठी श्रावणी धावले ही हात देण्यास पुढे गेली. ती नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेली. वडीलांना पाण्यात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलींना ते वाचवू शकले नाही.अचानक गुंजवणी नदीच्या पाण्याचा वेग व प्रवाह वाढल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.मृतदेह बाहेर काढताच सिद्धिविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे नेण्याच्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली होती.