वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा.....

Maharashtra varta
__________________________________________

पुणे(प्रतिनिधी)-------विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोनाविरोधातील लढाई सुरू असतानाच त्यासाठी आर्थिक निधीची चणचण होऊ नये म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्योगपतींपासून सर्वसामान्य जनताही आपला सहभाग नोंदवत असून, धनकवडी आंबेगाव पठार साई सिद्धी चौक ,पुणे येथील युवा उद्योजक संतोष साठे यांनी स्वतःचा आयुष हा  १ वर्षीय मुलाचा वाढदिवस साजरा न करता हजारो रुपयांची  रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली असल्याची माहिती युवा उद्योजक व प्रहारचे पुणे जिल्ह्याचे नेते संतोष साठे यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना दिली.
आयुष  या मुलाचा  आज, शनिवार दि. 2 मे 2020 रोजी पहिला वाढदिवस आहे . सोशल मीडियावर आयुषला शुभेच्छा व आशिर्वाद यांचा वर्षाव सुरू असल्याचे दिसले.

करोनाविरोधात देश उभा ठाकला असताना   प्रहार कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्या रक्कमेचा सदुपयोग करावा, असे आवाहन व सामाजिक संदेश  राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिला होता. त्या आवाहणाचे पालन संतोष साठे यांनी करून स्वतःच्या मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळून  हजारो रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. करोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी फूल न फुलाची पाकळी देण्याचे आवाहनही संतोष साठे यांनी यानिमित्ताने केले आहे.
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
To Top