हवेली पंचायत समितीचे सदस्य अजिंक्य घुले यांचे हृदयविकाराने निधन.

Maharashtra varta
हवेली  पंचायत समितीचे सदस्य अजिंक्य घुले यांचे  हृदयविकाराने निधन .

पुणे (प्रतिनिधी):----
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

हवेली तालुका पंचायत समितीचे मा. उपसभापती व विद्यमान सदस्य अजिंक्य घुले (वय ३३) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. हडपसर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.

 त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मांजरी गावावर व पुणे शहर व मांजरी पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली आहे.  पुणे जिल्हयातील राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक ,सहकार  क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सुरेश घुले हे त्यांचे वडील होत.अजिंक्य घुले यांनी आपल्या कारकिर्दीत रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी शिबीर, वृक्षारोपण, अनाथांना गोरगरीबांना मदत, अन्नधान्य वाटप,आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदी सामाजिक बांधीलकीचे उपक्रम प्रभावीपणे राबवले होते.
To Top