कापूरहोळ (प्रतिनिधी):--विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
नसरापूर ता.भोर येथील वैद्यकीय डॉक्टर यांचा कोरोना संसर्गापासुन संरक्षणासाठी ब्रायर क्राँप सायन्स लिमिटेड, हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान व भोर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजिक उपक्रमांतर्गत पीपीई किटचे मोफत वाटप करण्यात आले आहे. यावेळी सर्व डॉक्टरांनी समाधान व्यक्त करून या उपक्रमाचे स्वागत केले.
नसरापूर येथे खाजगी व शासकीय मिळुन ४५ वैद्यकीय डॉक्टरांना सिध्दिविनायक हाँस्पिटलमध्ये पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ब्रायर सायन्स कंपनीचे विवेक शिळीमकर, राजेंद्र शिळीमकर, वैभव शिळीमकर, सचिन शिळीमकर, योगेश शिळीमकर, कुरंगवडीचे पोलिस पाटील नरेश शिळीमकर, चंद्रकांत शिळीमकर, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र डिंबळे, डॉ. शाम दलाल, सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, भोर पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष किरण भदे, उपाध्यक्ष वैभव भुतकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य माणिक पवार,,वैभव धाडवे पाटील,बाळू शिंदे,विठ्ठल पवार इत्यादी पत्रकार व नसरापूर मधील वैद्यकीय व्यावसायिक मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र शिळीमकर यांनी सांगितले कि, सध्याच्या काळात डॉक्टर हेच आपले देव आहेत ते सुरक्षित राहीले तर समाज सुरक्षित राहील ही भावना या उपक्रमामागे ठेवुन आम्ही हा उपक्रम आयोजीत केला. डॉ. शाम दलाल यांनी बोलताना सामाजिक संस्थांचे आभार मानत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी व प्रतिकार शक्ती वाढवण्याचे आयुर्वेदीय उपायांची माहीती दिली.
डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॉ. शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.
विठ्ठल पवार.
पत्रकार,
मो. नं.९२२६८००७८३