देगावकरांनी यात्रा रद्द करून 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता मदत.

Maharashtra varta
(यात्रेसाठी जमा झालेला निधीतुन  1 लाख /- रुपयाचा डिमांड ड्राफ्ट देगाव ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देताना)
________________________________________

कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने केलेल्या मार्गदर्शक सुचनाद्वारे देगाव ता. भोर येथील भैरवनाथ ग्रामदैवताची यात्रा स्थगित करून यात्रेसाठी जमा झालेला निधीतुन  1 लाख  रुपयाचा डिमांड ड्राफ्ट  ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दि.21 मे 2020 रोजी भोर चे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव  यांच्याकडे सुपूर्द केला.

भोर तालुक्याचे  गटविकास अधिकारी  विशाल तनपुरे व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी गावांच्या यात्रा रद्द करून जमा होणाऱ्या वर्गणीतून काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या ,असे आवाहन करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत देगावकरांनी  ती रक्कम दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देगाव या गावांमध्ये दरवर्षी चैत्र कृ! पौर्णिमेला होणारी ग्रामदैवत श्री भैरव नाथदेवाची यात्रा देशावर व राज्यावर आलेल्या आकस्मित कोरोनाच्या साथीमूळे शासनाने केलेल्या मार्गदर्शक सुचनामुळे स्थगित करण्यात आली . यात्रेसाठी जमा झालेला निधीतुन  1 लाख रुपयाचा डिमांड ड्राफ्ट सामाजिक बांधीलकी व राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.
यावेळेस सरपंच विद्या यादव, देगावचे तलाठी स्वप्नील आंबेकर,वेळू मंडलअधिकारी विद्याताई गायकवाड,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र अप्पा सावंत,आबासाहेब यादव,आबासाहेब शेलार,भोर तालुका पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष किरण भदे, उपाध्यक्ष वैभव भूतकर,माणिक पवार आदी उपस्थित होते.

(देगावचे समाजसेवक व तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र अप्पा सावंत म्हणाले की,माझे गांव देगांव, हे अत्यंत छोटस खेडे.यंदा कोरोना च्या संकटामूळे गांवची यात्रा झाली नाही. मग गांवातील आम्ही  ग्रामस्थानी निर्णय घेतला की, वाचलेली रक्कम आपण  अश्या चांगल्या कामासाठी देऊ.सर्वजणांनी यथाशक्ति मदत करुन एक लक्ष रु.जमविले. व आज त्या रक्कमेचा डि.डि शासनाकडे  सुपूर्त केला.माझ गांव छोटसं आहे पण आम्ही सामाजिक कामासाठी नेहमीच तयार असतो,ही आत्मसुत्ती नाही  पण आमच्या जुन्या जाणत्या लोकांनी घालून दिलेली परंपरा आहे.तिच आम्ही पुढे चालवत आहोत.व या पुढेही ति अखंडपणे  चालत राहील.)
विठ्ठल पवार.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३.
------------------------------------------------------------
To Top