पुणे (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पुण्यात कामानिमित्त रहात असलेले मात्र कोरोना च्या या काळात आपल्या मुळ गावी पांडे ता. भोर येथे जाणारे राहुल साळुंखे व त्यांची आईस गावी जाण्यास मदतीचा हात देणारे प्रहारचे पुणे जिल्ह्याचे नेते व आदर्श रुग्णसेवक नयनभाऊ पुजारी व संतोष अभंग हे आमचे खरे देवदूत असल्याचे मत पांडे गावचे नागरिक राहुल साळुंखे यांनी व्यक्त केले.
पुण्यातून गावी जाताना साळुंखे व त्यांच्या आईस खेड शिवापूर टोलनाक्यावर चेक नाक्यावर थांबवले,त्यांना याबाबत गावी जाण्यास पास व परवानगी काढली आहे का?असे विचारले मात्र शहरात उदरनिर्वाहाची सोय नसल्याने आम्ही आमच्या गावी ,घरी अन्नधान्य असून आम्ही तिथे चाललो आहे.अवकाळी पावसामुळे गावाकडचे घरात पाणी शिरले असून अन्नधान्य भिजत आहे. आम्हाला जगण्याचा एकच मार्ग म्हणजे आमच्या घरी जाऊन त्या अन्नधान्यावर आम्ही गुजराण करणार आहोत ,आम्हाला घरी जाऊ द्यावे ,असे त्यांनी सांगितले. मात्र कोविड19 च्या नियमांचे पालन करत पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. साळुंखे यांनी प्रहारचे नेते नयनभाऊ पुजारी यांच्याशी संपर्क साधून स्वतःची झालेली अडचण सांगून मदत मागितली , या अडचणींची गांभीर्याने विचार करून ते खेडशिवापुर तात्काळ आले. पोलिसांना सत्य परिस्थिती सांगून साळुंखे व त्यांच्या आईस पुढे सोडण्यात आले.या बाबीतून नयन पुजारी व संतोष अभंग यांनी मानवतेचे दर्शन घडवले. आज माणूस चंद्रावर पोहचला, मात्र आज माणसांच्या माणुसकीच्या दुनियेतुन तो हरवत चाललाय.खरोखरच पुजारी व अभंग यांनी संकट काळात साळुंखे परिवारास केलेली मदत व सहानभूती चे कौतुक सोशल मीडियावर होत असून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी "सलाम नयनभाऊ तुमच्या कार्यास"अश्या कमेंट करून शुभेच्छा व आभार व्यक्त केले आहे.
"महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना नयनभाऊ पुजारी म्हणाले की, ज्या ज्या वेळेस आम्हास पुणे जिल्ह्यातुन अथवा महाराष्ट्र राज्यातून अचानक,रात्री-अपरात्री मदतीसाठी फोन येतो,तेव्हा त्या मदतीसाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. गोर गरिबांचे कैवारी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली व गौरव भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत.
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३.
_______________________________________