खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गॅंग एलसीबीच्या जाळ्यात.

Maharashtra varta
खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गॅंग एलसीबीच्या जाळ्यात.

पुणे (विशेष प्रतिनिधी)- 
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गॅगला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पोलिसांनी अटक केली आहे.  खंडणीचा कारणावरून १७ मे रोजी खडकवासला येथील एका घरावर मामा गॅगने अंधाधुंद गोळीबार केला होता.

चेतन उर्फ मामा गोविंद लिमण (वय २८ रा. खडकवासला) , किरण महेंद्र सोनवणे (वय २३, रा. किरकटवाडी ता. हवेली), दिगंबर दीपक चव्हाण (वय २१ रा. किरकटवाडी ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विजय उर्फ खंडू लक्ष्मण चव्हाण असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार प्रकरणी राजू चंदू सोनवणे (वय ३५ रा. खडकवासला) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी मामा फिर्यादीत सोनवणे यांच्याकडून चार महिन्यापासून खंडणी वसूल करत होता. १७ रोजी मामाने तीन जणांना सोनवणे यांच्याकडे पाठवून आणखी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र सध्या काम धंदा नसल्याने सोनवणे यांनी पैसे देण्यास नकार दिला सोनवणे यांनी नकार दिल्यानंतर खंडणी मागण्यासाठी आलेल्या तिघांनी सोनवणे यांना ठार मारण्याची धमकी दिली आणि ते निघून गेले.

काही वेळेनंतर मामा त्याच्या पाच साथीदारांना घेऊन आला सोनवणे आणि त्यांचे साथीदार जखमी विजय चव्हाण त्याचा घरासमोर येऊन अंदाधुंद गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात विजय चव्हाण यांच्या डोळ्यावर गोळी लागल्याने गंभीर झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .हवेली पोलीस घटनेचा तपास करीत असताना एलसीबी ने समांतर तपास केला. एलसीबीच्या पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी मामा त्यांच्या साथीदारांसोबत डोणजे येथे फिरत आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी मामा आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आरोपी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पेस्टल आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली.
पोलीस ठाण्यात तक्रार द्या असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील ,पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे ,साहायक फौजदार दत्तात्रय जगताप ,कार्यक्षम पोलीस कर्मचारी अमोलराव शेडगे, मंगेश भगत,बाळासाहेब खडके, दिलीप जाधववर ,शब्बीर पठाण ,मुकुंद आयाचित, विजय कांचन ,चंद्रकांत जाधव लियाकत मुजावर, रौफ इनामदार, धीरज जाधव ,समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली आहे.
To Top