पुणे (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन
कोरोना बाबत भोर तालुक्यात विविध ठिकाणी चेक नाके आहेत.त्यामध्ये चेलाडी चेक पोस्ट नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मांगडे वाडी येथील उमेश मांगडे याने शिवीगाळ व धक्का बुक्की केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या माहितीनुसार आज दि.९/५/२०२० रोजी दु.२:३६ वा. उमेश मांगडे रा.मांगडेवाडी ता.हवेली. गाडी क्रमांक-MH 12. NY -7771 यांना आरोग्य तपासणीस चेलाडी (नसरापूर)येथील चेक नाक्यावर थांबवले असता,सदर गाडीतून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांनपैकी दोन तरूणांनी पथकावर कार्यरत असणारे कर्मचारी मंगेश विठ्ठल टिळेकर, (पशुवैद्यकीय कर्मचारी) अवचरे एकनाथ आनंदराव(उपशिक्षक) व भोसले उत्तम साहेबराव भोसले(उपशिक्षक) यांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिस कर्मचाऱ्यांसमक्ष आरोग्य तपासणीस नकार देऊन अश्लील भाषेत शिविगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला . सदर गाडीतील प्रवासी कन्टोंटमेंट झोनमधून प्रवास करत होते .तरी चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजगड पोलिसांनी उचित कारवाई करून आरोपीने शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला त्यावरून सदरचा गुन्हा आरोपींविरुद्ध भा.द.वि कलम ३५३,१८८ २६९ ,२७०,२७१ नुसार दाखल केलेला आहे.
महाराष्ट्र वार्ताशी बोलताना भोर पंचायत समितीचे प्र.गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ म्हणाले की, गेली एक महिनाभर प्राथमिक शिक्षक नाकाबंदीचे काम अहोरात्र करत पोलीस आणि प्रशासनास सहकार्य करून प्रामाणिक,कर्तव्यदक्ष सेवा बजावत असताना त्यांना शिवीगाळ व दमदाटी होणे हे गंभीर व अनुचित प्रकार असून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी.