पुणे (विशेष प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी भोर तालुक्यात विविध ठिकाणी चेकनाके आहेत .त्यामध्ये किकवी जवळील मोरवाडी --- काळदरी येथील चेक पोस्ट नाक्यावरील दोन शिक्षक कर्मचाऱ्यांना मोरवाडी येथील सुशील राऊत याने शिवीगाळ व दमदाटी केली असून त्याच्यावर राजगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भोर उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये मौजे मोरवाडी -काळदरी येथील भोर तालुका नाकाबंदी पथकांमध्ये करण्यात आलेले आहे. कोरोना महामारी प्रतिबंधक उपाययोजना कामी संचारबंदी चे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेल्या आहेत. दिनांक 9 मे 2020 रोजी रोजी 5 वाजून 10 मिनिटांनी तपासणी पथक आपले काम करीत असताना मोटारसायकल वरून एक व्यक्ती सुशील राऊत. रा. मोरवाडी कडून काळदरी इकडे जात होता. त्याने तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क लावले नव्हते. त्यांना कोठे जायचे असे पथकातील कर्मचारी यांनी विचारले असता सदर व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली
सदर इसमाने राष्ट्रीय आपत्ती भारतीय व्यवस्थापन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा केलेला असून शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करून शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकी देणे ,शिवीगाळ करणे अशा प्रकारे संचार बंदीचे उल्लंघन करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असून राजगड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.पुढील तपास किकवी पोलीस स्टेशनचे पी. एस.आय.निखिल मगदूम हे पुढील तपास करीत आहेत.
भोर तालुक्यातील नाकाबंदीवर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दम दाटी होण्याच्या दोन घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. पहिली चेलाडी येथे तर दुसरी मोरवाडी येथे. याबाबत सोशल मीडियावर या निंदनीय घटनेचा निषेधही व्यक्त झालेला दिसला.
भोर पंचायत समितीचे प्र.गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ म्हणाले की, गेली एक महिनाभर प्राथमिक शिक्षक नाकाबंदीचे काम अहोरात्र करत पोलीस आणि प्रशासनास सहकार्य करून प्रामाणिक,कर्तव्यदक्ष सेवा बजावत असताना त्यांना शिवीगाळ व दमदाटी होण्याच्या दोन घटना एकाच दिवशी होणे हे गंभीर व अनुचित प्रकार असून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी.