नाकाबंदी कामातून शिक्षकांची लवकरच होणार मुक्तता.. पोपट निगडे

Maharashtra varta

कापूरहोळ (प्रतिनिधी):

कोरोना बाबत करण्यात आलेल्या भोर तालुक्यातील नाकाबंदी बंदी नेमणुकी ठिकाणी शिक्षकांना होत असलेली शिवीगाळ व अर्वाच्य व अरेरावीची भाषा बाबत  त्यांना पोलीस संरक्षण व नेमणूका रद्द करण्याबाबतचे निवेदन प्रांत यांना देण्यात आले ,याबाबत चर्चा होऊन   लवकरच या कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याचे आश्वासन  प्रांत यांनी दिले असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपट निगडे व भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराम ओंबळे यांनी दिली.

भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आपल्याकडील आदेशान्वये तालुक्यात एकूण 28 ठिकाणांचे नाकाबंदी साठी व आरोग्य तपासणी नाके साठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती. परंतु दिनांक 9 मे 2020 रोजी चेलाडी व मोरवाडी या नाक्यावर शिक्षकांना अरेरावीची भाषा व शिवीगाळ करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .सदर  यावेळी नायब तहसीलदार व पोलीस कर्मचारी उपस्थित असताना देखील ही घटना घडल्यामुळे शिक्षकांचे काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसमोर   अशा घटना घडत असतील तर ही बाब निश्चितच खेदजनक आहे, अशी घटना घडल्यामुळे शिक्षकांच्या जिवास धोका निर्माण झाल्याची भावना सर्व शिक्षक या निमित्ताने व्यक्त करीत आहेत. तरी आपल्या स्तरावरून योग्य ते निर्णय होऊन शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात किंवा त्यांना संरक्षण द्यावे अशी लेखी  विनंतीचे निवेदन  उपविभागीय दंडाधिकारी प्रांत तहसीलदार भोर गटविकास अधिकारी भोर, गटशिक्षणाधिकारी  यांना भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी  पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे,भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराम ओंबळे,शिक्षक नेते,महेंद्र अप्पा सावंत,विजयकुमार थोपटे,संदीप दानवले ,वसंत कंक आदी उपस्थित होते.
To Top