पुरंदर शिक्षक पतसंस्थेच्या मदतीचा हात लक्षवेधी : आमदार संजय जगताप.

Maharashtra varta
(पुरंदर  हवेलीचे आमदार  संजय जगताप यांनी  ग्रामीण  संस्था  यांच्या तर्फे  सुरु  केलेल्या मोफत  "आनंदी  थाळी"  या   उपक्रमास  'पुरंदर  तालुका  प्राथमिक  शिक्षक  पतसंस्था'  यांच्याकडून  10  खाद्यतेलाचे  डबे  आमदार  संजय  जगताप   याच्या  उपस्थितीत  सुपूर्त  करताना)
__________________________________________
   भोर ( प्रतिनिधी) :----विठ्ठल पवार.
     (महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

पुरंदर  हवेलीचे आमदार  संजय जगताप यांनी  ग्रामीण  संस्था  यांच्या तर्फे  सुरु  केलेल्या मोफत  "आनंदी  थाळी"  या   उपक्रमास  'पुरंदर  तालुका  प्राथमिक  शिक्षक  पतसंस्था'  यांच्याकडून  10  खाद्यतेलाचे  डबे  आमदार  संजय  जगताप   याच्या  उपस्थितीत  सुपूर्त  करण्यात  आले.  

यावेळी  सभापती संगीताताई  म्हेत्रे , उपसभापती  सुनिल  कांबळे ,  मानद  सचिव  गणेश  कामठे ,  राज्य  शिक्षक  नेते   महादेव  माळवदकर  पाटील , पुरंदर  नागरीचे  सरव्यवस्थापक   अनिल उरवणे , शिक्षक नेते संदीपअप्पा  जगताप, पुणे जिल्हा पत्रकार  संघांचे  अध्यक्ष  सुनिलजी   लोणकर , शिक्षक  समिती चे  अध्यक्ष  अनिल  चाचर, पदवीधर  सभेचे  नेते  वसंत  कामथे,  केंद्रप्रमुख  संघटनेचे  अध्यक्ष  रोहिदास  कोलते,   केंद्रप्रमुख  सुरेश लांघी,  केंद्रप्रमुख  अनिल जगदाळे ,   शागृन्धर  कुंभार,  लतीफ इनामदार ,सासवडचे   माजी  नगरसेवक   मुन्ना  शिंदे ,  संतोष  गिरमे , जय लादे , मनोज सटाले,  सचिन बोरावके, मोबीन  बागवान , विजय  कदम   हे  उपस्थित  होते .
  'महाराष्ट्र वार्ताशी' बोलताना पुरंदर  हवेलीचे आमदार संजय जगताप म्हणाले की, "पुरंदर तालुका शिक्षक  पतसंस्था"  ही  पुणे  जिल्ह्यातील  नावाजलेली  पगारदार  संस्था  आहे.  कोरोना च्या  संकटात  संस्थेच्या   मदतीचा  हात  लक्षवेधी असून  संस्थेने   सामाजिक  बांधिलकी जोपासली   आहे.  गेल्या  महिनाभरात  प्राथमिक,  माध्यमिक  शिक्षकानी  कोरोना  लढाईत  सर्वतोपरी  मदत  देऊ  केली  असून  प्रशासनास  खूप  सहकार्य  केले आहे.  

 उपस्थितांचे  स्वागत  वसंत  कामथे  यांनी केले  तर  आभार  गणेश  कामठे  यांनी  मानले.
बातम्यांसाठी संपर्क---विठ्ठल पवार.
पत्रकार, भोर.
मो. नं.९२२६८००७८३.

To Top