कापूरहोळ (प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील नसरापूर येथील स्वप्नलोक सोसायटीतील १५३ कुटुंबांना शनिवारी (दि.९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा स्वप्नलोक सोसायटीचे अध्यक्ष गणेश बागल यांच्या पुढाकारातून मोफत फळभाज्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नसरापूर प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने नसरापूरातील सर्वच दुकाने सध्या बंद आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व भाजी मंडई देखील आठवडाभरापासून बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.
स्वप्नलोकमधील रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष गणेश बागल यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी या फळभाज्यांचे मोफत वाटप केले.
सोसायटीतील रहिवाशांसाठी दररोज एक लीटर दूध व २० लीटर पाण्याच्या जारचे वाटप चालू असतानाच गणेश बागल यांच्या औदार्याचे पुन्हा दर्शन झाल्याने नसरापूर परिसरात बागल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी बाबू झोरे, ग्रामसेवक निकुम, इरफान मुलाणी, जाकीर जमादार, मच्छिंद्र कुंभार, अतुल पुजारे, संजय खुटवड, रामदास चोरगे, पप्पू तनपुरे, शशिकांत पवार, आकाश सूर्यवंशी, मेघराज छल्ला, अभिजीत घुगे, मोहन शिळीमकर, सुधाकर शिळीमकर, मनोज वाल्हेकर, बाळकृष्ण यादव, पांडुरंग वाल्हेकर, राहुल पवार, डिंबळे, बापट, सोमनाथ शेडगे, आदित्य भदे, ओमकार डिंबळे, विनायक गेडाम, एकनाथ कचरे, रत्नेश साळवी यांनी मोलाचे योगदान दिले.