नितीनदादा इंगुळकर युवा मंचच्या वतीने अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण.

Maharashtra varta

("नितीनदादा इंगुळकर" युवा मंच च्या " माध्यमातून कामथडी ता. भोर  परिसरात गोरगरीब, 80 कुटुंबाना  अन्नधान्य व आiवश्यक वस्तूंचे वितरण करताना)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

कापूरहोळ ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

"नितीनदादा इंगुळकर युवा मंच"च्या  माध्यमातून
कामथडी ता. भोर  परिसरात गोरगरीब, मजूर,वंचित व रेशनकार्ड नसलेले  निराधार  80 कुटुंबाना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. 

कामथडी ता. भोरचे नितीनदादा इंगुळकर व मित्र परिवार आणि "नवयुग मित्र मंडळ,कामथडी"  यांच्या माध्यमातून या अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुळे देशात,राज्यात,पुणे जिल्ह्यात तसेच  भोर तालुक्यातील कामथडी   परिसरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व्यापार बंद असल्या कारणामुळे गोरगरिबांना जेवणाची प्रचंड  गैरसोय होत  होती, 

गोरगरिबांची महत्वाची पोटा पाण्याची अडचण लक्षात घेऊन( दि.9 एप्रिल 2020) रोजी नितीनदादा इंगुळकर युवा मंचच्या  माध्यमातून कामथडी, करंदी खे. बा.  चेलाडी, पवारवाडी,नसरापूर देगाव परिसरामध्ये मध्ये  80 गोगरिब ,मजूर हातावर पोट असणाऱ्या कुटुबांना 80 अन्न धान्याचे किट  वाटप केले.

या कामी कैलास इंगुळकर, गोरक्ष इंगुळकर ,अनिकेत इंगुळकर, चंद्रकांत लोहार,राहुल बोरगे,बापू खाटपे,काशीनाथ इंगुळकर, गजानन मांढरे,जयवंत वाल्हेकर,नवयुग मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य  यांचे सहकार्य लाभले.
("महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना "नितीनदादा इंगुळकर म्हणाले की, आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी  आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारण्यासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी.)


           ( नितीनदादा इंगुळकर" युवा मंच) 

विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
To Top