■■■■■■■■■■■■■■■■
नसरापूर( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना संदर्भातील जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकांना "होम क्वारंटाईन" शब्दाचा अर्थ समजून घेण्याची खूप गरज आहे. "होम क्वारंटाईन" म्हणजे तो कोरोना बाधीत रुग्ण नव्हे. सध्या काही लोक आपल्या गावात इतर गावातून किंवा शहरातुन आपल्या नातेवाईकांच्याकडे राहायला आले आहेत. त्यापेकी काही लोकांना सर्दी, खोकला असू शकतो. पिण्याचे पाणी बदलल्यामुळे सुद्धा असे आजार होऊ शकतात. याचा अर्थ त्यांना कोरोना झाला आहे असे समजू नका असे मत "वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर" यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले.
हातावर होम क्वारंटाईन शिक्का मारलेली व्यक्ती कोरोनाची रोगी नाही. पण या लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, म्हणून त्यांना असे शिक्के मारले जातात,असे लोक गावात फिरत असलेले दिसून आल्यास त्यांना घरातच बसण्याची विनंती करा. ऐकत नसल्यास पोलीस पाटील किंवा सरपंच यांना कळवा ते पोलीसांना कळवून माहिती देतील, परंतु या लोकांना गावात प्रवेश करण्यास विरोध करू नका असे देवकर यांनी सांगितले.
पुढे देवकर म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने
घरीच रहा आणि सतर्क रहा.कोरोना संदर्भात योग्य ती काळजी घ्या आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळा.सामाजिक अंतर राखा आणि कोरोनाला वेळीच रोखा.
"एकमेकांना देऊ या साथ, कोरोनावर करु या मात"
असे आशयपूर्ण सामाजिक संदेश कोरोनाबाबत देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन वेल्हे तालुक्यातील जनतेस केलेले आहे.
विठ्ठल पवार.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३
___________________________________________●◆●◆◆◆
