(राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 46 वाहन चालकांवर अनावश्यक फिरल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले )
__________________________________________
कापूरहोळ (प्रतिनिधी):---- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
दि.8 एप्रिल 2020 रोजी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 46 वाहन स्वारांवर अनावश्यक फिरल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची वाहने जप्त करण्यात आलेली असल्याची माहिती "राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे" यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण देश 'लॉकडाऊन' करण्यात आलेला आहे. यापूर्वी 31 मार्च 2020 रोजी अश्या 30 वाहन स्वारांवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त केली होती.
पुन्हा याद्वारे निवेदनाद्वारे सारोळा, किकवी,कापूरहोळ, नसरापूर,खेडशिवापुर परिसरातील वाहने अनावश्यक फिरताना दिसल्यास राजगड पोलीस स्टेशन, नसरापूर हे त्यास ताब्यात घेऊन त्याची वाहने जप्त करून 15 दिवस नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स,मंगल कार्यालयात होम क्वारंटाईन केले जाणार आहे.याची पूर्वकल्पना सोशल मीडियाद्वारे राजगड पोलीस स्टेशन ने दिली होती. मात्र काही वाहन तथा वाहनचालक ही बाब गांभीर्याने न घेता अनावश्यक फिरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.
विठ्ठल पवार.
पत्रकार ,
मो. नं.९२२६८००७८३.
■■■■■■■■■■■■■■■■■□■■■■■■■
