मास्क न घातल्याने एक हजार रुपयाचा दंड

Maharashtra varta
              (मास्क चा वापर करा)
__________________________________________

कापूरहोळ (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कोरोना विषाणूचा  संसर्ग होऊ नये व त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने लॉक डाऊन काळात शासकीय आदेश जारी केलेला असताना मात्र भोर शहर व ग्रामीण मधील  काही तरुण या आदेशाचे उल्लंघन करताना दिसले.

 भोर  पोलीस स्टेशन गस्त घालत असताना मास्क  न लावलेल्या तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
भोर-महाड रस्त्यावर पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असताना पानवळ ता. भोर येथे तीन तरुण चारचाकी वाहनातून एकत्रितपणे मास्क न लावता फिरत असल्याचे  निदर्शनास आले. तात्काळ त्यांच्यावरती भोर पोलिस स्टेशनने गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांनी तपास करून आरोपींना भोर  कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भोर  तालुक्यामध्ये मास्क न घातल्याने दंड होण्याची  पहिलीच घटना असल्याचे दिसून येत आहे.

भोर  पोलीस स्टेशन चे  पोलीस निरीक्षक राजू मोरे  "महाराष्ट्र वार्ताशी "बोलताना म्हणाले की,
कोरोना विषाणूचा  संसर्ग होऊ नये व त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने लॉक डाऊन काळात शासकीय आदेश जारी केलेत त्याचे तंतोतंत पालन प्रत्येकाने करणे हे महत्त्वाचे आहे. मास्क लावणे हे आपल्या व कुटुंबासाठी महत्वाचे आहे. सुरक्षितता हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे.

To Top