"इंगवली" गावच्या यात्रेची वर्गणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला.

Maharashtra varta
(यात्रेसाठी जमा झालेला निधीतुन  २५०००/- रुपयाचा धनादेश इंगवली ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देताना)
________________________________________

कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने केलेल्या मार्गदर्शक सुचनाद्वारे इंगवली ता. भोर येथील ग्रामदैवताची यात्रा स्थगित करून यात्रेसाठी जमा झालेला निधीतुन  २५०००/- रुपयाचा धनादेश  ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दि.6 एप्रिल 2020 रोजी भोर तालुक्याचे  गटविकास अधिकारी  विशाल तनपुरे व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे  यांच्याकडे सुपूर्द केला.

भोर तालुक्याचे  गटविकास अधिकारी  विशाल तनपुरे व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी गावांच्या यात्रा रद्द करून जमा होणाऱ्या वर्गणीतून काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या ,असे आवाहन करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत इंगवली करांनी  ती रक्कम दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील इंगवली या गावांमध्ये दरवर्षी चैत्र शु! त्रयोदशीला होणारी ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा देशावर व राज्यावर आलेल्या आकस्मित कोरोनाच्या साथीमूळे शासनाने केलेल्या मार्गदर्शक सुचनामुळे स्थगित करण्यात आली असून  
यात्रेसाठी जमा झालेला निधीतुन  २५०००/- रुपयाचा धनादेश सामाजिक बांधीलकी व राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.
त्याचबरोबर गावातील दुर्बल, गरजू,वंचित घटकातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यासाठी गावातील तरुणांचे मोठे सहकार्य लाभले.
बातम्यांसाठी संपर्क----
विठ्ठल पवार.
पत्रकार .
मो. नं.९२२६८००७८३
___¢€€€€¢£√€€€€€¥€¥¥€¥€€¥€£√£££¢€€
To Top