(पत्रकार वैभव धाडवे पाटील यांनी आपल्या घरी सारोळा, भोर येथे दि.5 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजता, 9 मिनिटं , मेणबत्ती लावून सांघिक शक्तीत सहभाग घेताना)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
दि.5 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजता, 9 मिनिटं भोर तालुक्यातील लाईट्स ऑफ.कोरोनाच्या अंधकारात दिवे, मेणबत्ती, टॉर्चच्या उजेडात आसमंत उजळून ज्योती ज्योतीने महासूर्य साकारल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी म्हणजे आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन केलं होत. कोरोनावर आपण मात करणारच याबाबत सांघिक शक्तीचे दर्शन घडवून दिले.
रात्री 9 वाजता भोर तालुक्यातील नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावले असताना दिसून आले.
"दैनिक पुढारीचे पत्रकार वैभव धाडवे पाटील" यांनी याबाबत "महाराष्ट्र वार्ताशी बोलताना म्हणाले की,, आज रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च आपण सर्वांनी लावली. यामुळं चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट झाला. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश या निमित्ताने मिळाला. या कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झालेत .या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे.ते आज 5 एप्रिलला आपल्याला कोरोनाचे संकट टाळा सांघिक महाशक्तीचं जागरण करून दिले आहे.
