("निसर्ग युवा मंचच्या" माध्यमातून मांगडेवाडी ता. हवेली (पुणे) परिसरात गोरगरीब, 700 कुटुंबाना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करताना)
■■■■■■■■■■■■■■■
खेड शिवापूर ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"निसर्ग युवा मंचच्या" माध्यमातून
मांगडेवाडी ता. हवेली (पुणे) परिसरात गोरगरीब, मजूर,वंचित व रेशनकार्ड नसलेले निराधार 700 कुटुंबातील एकूण 3200 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. निसर्ग युवा मंच व मांगडेवाडीच्या आदर्श उपसरपंच सौ. निर्मलाताई सुभाष(तात्या )मांगडे यांच्या माध्यमातून या अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुळे देशात,राज्यात,पुणे जिल्ह्यात तसेच मांगडेवाडी ता. हवेली परिसरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व्यापार बंद असल्या कारणामुळे गोरगरिबांना जेवणाची प्रचंड गैरसोय होत होती,
गोरगरिबांची महत्वाची पोटा पाण्याची अडचण लक्षात घेऊन( दि.5 एप्रिल 2020) रोजी निसर्ग युवा मंच व मांगडेवाडीच्या आदर्श उपसरपंच सौ. निर्मलाताई सुभाष(तात्या )मांगडे यांच्या वतीने मांगडेवाडी परिसरामध्ये मध्ये 700 कुटुबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.
(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना "मांगडेवाडीच्या आदर्श उपसरपंच सौ. निर्मलाताई सुभाष(तात्या )मांगडे" म्हणाल्या की,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी.)
निसर्ग युवा मंचाचे बंटीशेठ मांगडे म्हणाले की,
स्वतःचा,कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र कोरोनाशी मुकाबला करत असलेले आपले जिगरबाज डॅॅाक्टर्स ,आरोग्य कर्मचारी,पोलिस,सैनिक आणि सर्व शासकिय कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवू या. त्यासाठी गरज आहे फक्त आपल्या मदतीच्या हाताची.)
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
