कासुर्डी (गु. मा.) येथील आदिवासी बांधवाना अन्नधान्याचे वाटप... विशालजी तनपुरे.

Maharashtra varta
(कासुर्डी गु. मा.येथील आदिवासी समाजातील लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण गटविकास अधिकारी विशालजी तनपुरे,विस्तार अधिकारी राठोड ,हुजरे आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चांदगुडे यांच्या हस्ते करताना)
__________________________________________

कापूरहोळ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कासुर्डी गु. मा. येथील दत्तमंदिर मधील  गरीब, गरजू ,वंचित कातकरी आदिवासी समाजातील 22कुटुंबातील एकूण 96 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

कासुर्डी गु. मा.येथील आदिवासी समाजातील लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण गटविकास अधिकारी विशालजी तनपुरे,विस्तार अधिकारी राठोड ,हुजरे आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चांदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कासुर्डी गु. मा. च्या  सरपंच  सारिका मालुसरे , ग्रामविकास अधिकारी राहुल राठोड,आरोग्यसेवक बाळासाहेब पिसाळ यांची या कामी विशेष मदत झाली

(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना "भोरचे गटविकास अधिकारी विशालजी तनपुरे" म्हणाले की,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी  आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या. 

(कासुर्डी गु. मा. च्या आदर्श युवा सरपंच  सारिकाताई मालुसरे म्हणाल्या की,स्वतःचा,कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र कोरोनाशी मुकाबला करत असलेले आपले जिगरबाज डॅॅाक्टर्स ,आरोग्य कर्मचारी,पोलिस,सैनिक आणि सर्व शासकिय कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवू या. त्यासाठी गरज आहे फक्त आपल्या मदतीच्या हाताची.)
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-----
विठ्ठल पवार.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
To Top