(कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी भोर तालुक्यातील विविध गावांना भेटी देताना)
■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ( प्रतिनिधी):-----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी भोर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली व कोरोना प्रतिबंधात्मक सूचना केल्या.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असुन भोर तालुक्यातील विविध गावच्या ग्रामस्थांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे के. डी. भुजबळ यांनी सांगितले. भोर तालुक्यातील गुहिनी, भुतोंडे, भोर शहर परिसर ,इंगवली, आळंदे,भैरवनाथ नगर,कापूरहोळ परिसर आदी परिसरातील गावांची पाहणी केली.
पुणे,मुंबई शहरांमधून गावात आलेले एकूण नागरिक यांची माहिती ग्रामसेवक व आशा वर्कर यांच्याकडून घेतली. गावात आजारी कोण आहेत का?याबाबत माहिती जाणून घेतली.
गावातील लोकांनी कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. पुणे व मुंबई हुन व अन्य ठिकाणाहून नव्याने गावांत आलेल्या यांची माहिती अपडेट ठेवण्याबाबतच्या सूचना आशा वर्कर व ग्रामसेवक यांना दिल्या.
या भागातील ग्रामस्थांना योग्य खबरदारी घेण्यासोबतच घराबाहेर पडू नका, वेळोवेळी हात धुवा, प्रशासनाला सहाय्य करा या सुचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी गावांची पाहणी करत सूचना दिल्या. यावेळी गावचे ग्रामसेवक,आशा वर्कर उपस्थित होते.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३
◆◆◆●■■◆◆■◆◆■◆◆◆◆■◆◆■■◆◆◆◆
