(बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार;-
तुमच्यावर आता ड्रोन ची नजर.:--दत्तात्रय दराडे).
■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील शनिवारपासून (दि. 4 एप्रिल)पासून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करण्यात येत आहे. या चित्रिकरणात जे येतील, त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी "महाराष्ट्र वार्ताला" दिली.
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन करण्यात आले आहे. मात्र तरीही शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान विविध गावचे नागरीक,युवक विनाकारण घराबाहेर पडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करत आहेत.
या चित्रिकरणामध्ये जे येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये."असे दराडे यांनी सांगितले.
