("वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या" माध्यमातून
दुर्गम ,डोंगरी भागातील येथील आदिवासी समाजातील 96 कुटुंबातील एकूण 311 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करताना)
■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वेल्हे तालुक्यातील दुर्गम ,डोंगरी भागातील आदिवासी समाजातील 96 कुटुंबातील एकूण 311 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या वेल्हे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने किराणा माल ,मास्क व सॅनिटायजर त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले.यासाठी वेल्हे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद लोहकरे,राजेंद्र जाधव यांनी पुढाकार घेतला.या सर्वांनी जपलेले सामाजीक भान कौतुकास्पद आहे.
अन्न धान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण राऊत व इतरांची विशेष मदत झाली.
(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना वेल्हे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद लोहकरे म्हणाले की,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी. स्वतःचा,कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र कोरोनाशी मुकाबला करत असलेले आपले जिगरबाज डॅॅाक्टर्स ,आरोग्य कर्मचारी,पोलिस,सैनिक आणि सर्व शासकिय कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवू या. त्यासाठी गरज आहे फक्त आपल्या मदतीच्या हाताची.)
विठ्ठल पवार.
पत्रकार ,पुणे (भोर)
मो. नं.९२२६८००७८३.
◆●●◆◆◆●●●●◆●◆●●◆◆◆●●●◆◆◆◆◆◆
