(पत्रकार दत्तात्रय बांदल यांनी स्वतःच्या चारचाकी गाडीवर ध्वनी क्षेपक लावून संगमनेर- माळवाडी पंचक्रोशी परिसरात दिवस-रात्र स्व -खर्चाने फिरून गावागावात जनजागृती चे काम करत आहेत.)
■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ( वार्ताहर):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना निर्मूलनाबाबत केंद्र व राज्य शासन प्रभावीपणे देश व राज्य पातळीवर अंमलबजावणी करत असताना समाजातील प्रत्येक घटक या कामी सहकार्य करत आहे. संगमनेर ता. भोर येथील प्रभात वृत्तपत्राचा संगमनेर चा वार्ताहर, पत्रकार दत्तात्रय बांदल यांनी स्वतःच्या चारचाकी गाडीवर ध्वनी क्षेपक लावून संगमनेर- माळवाडी पंचक्रोशी परिसरात दिवस-रात्र स्व -खर्चाने फिरून गावागावात जनजागृती चे काम करत आहेत.
"घोषणा देऊ जागृत राहू,कोरोनाला पळवून लावू" अश्या स्वरूपाबाबत त्यांची ऑडिओ असून ती ऑडिओ त्यांनी बनवून घेऊन गाडीमध्ये स्पीकर मशीन व साउंड बॉक्स ठेवला असून गाडीच्या वर कर्ण लावले आहेत.
गावातील चौकात, गल्लोगल्ली थांबून ती ऑडिओ पूर्ण ऐकवून दाखवून जनजागृती चे काम गेली 13 दिवसापासून करत आहेत.
याबाबत "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना दत्तात्रय बांदल म्हणाले की, मी समाजाचा, समाज माझ्यासाठी, ही सामाजिक बांधिलकी मी जपत आहे. या कामी मला भोर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शन लाभले. या परिस्थितीत सामाजिक काम करणे ही काळाची गरज ओळखून करत आहे.
भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंगजी शेटे म्हणाले की ,आम्ही सर्वच पत्रकार कोरोनाबाबत प्रभावीपणे काम करून जनजागृती करत आहे.
भोर तालुक्यातील दै.प्रभातचे आदर्श व सामाजिक बांधिलकी जपणारे प्रेरणादायी पत्रकार दत्तात्रय बांदल यांनी जनजागृती करून कोरोनामुळे दुष्परिणाम व उपाय संदेश फिरून सांगत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
